महिलेच्या पर्समधुन ७० हजाराचा ऐवज लंपास

औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील मेडिकल स्टोअर्सवर खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधुन चोरट्यांने ७० हजार ५०० रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर रोडवरील इस्सार पेट्रोल पंपाजवळील महेश मेडिकल स्टोअर्स येथे घडली.
गारखेडा परिसरातील रहिवासी असलेली ४० वर्षीय तक्रारदार महिला पुंडलिकनगर रोडवर असलेल्या इस्सार पेट्रोल पंपाजवळील महेश मेडिकल स्टोअर्सवर खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी चोरट्याने तक्रारदार महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधुन तीच्या पर्समधुन ७० हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असलेली छोटी पर्स चोरून नेली. चोरी गेलेल्या पर्समध्ये सोन्याचे मणी-मंगळसूत्र, दोन अंगठ्या, सोन्याचा एक पिळा, रोख रक्कम असा ऐवज होता. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस अंमलदार शेख करीत आहेत.