शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून चार दुचाकी लंपास केल्या असून वाढत्या वाहन चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी मोहिम सुरू केली आहे.
सुदर्शन बन्सीलाल पपैये (वय ३७, रा. शरणापूर रोड) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एझेड-१७६२) चोरट्याने ३ पेâब्रुवारी रोजी घाटी रूग्णालयातील ओपीडी समोरून चोरून नेली. शेख आलीम शेख फहीम (वय २५, रा. काचीवाडा, चेलीपूरा ) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीडब्ल्यू-५३२४) चोरट्याने ५ फेब्रुवारी रोजी शहाबाजार परिसरातून चोरून नेली. सोमीनाथ सांडु घुगे (वय २८, रा. धोंडखेडा, ता. औरंगाबाद) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएन-७६७१) चोरट्याने २५ जानेवारी रोजी एमआयडीसी वाळूज परिसरातील स्टारलाईट कंपनीच्या प्रवेशद्वारापासून चोरून नेली. सिद्धार्थ अर्जुन कवडे (वय ३६, रा. राजनगर, मुकुंदवाडी) याची दुचाकी क्रमांक (एचएम-२०-एफके-६४०८) चोरट्याने ६ फेब्रुवारी रोजी बन्सीलालनगर परिसरातील एका हॉटेलसमोरून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी वाहने चोरून नेणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे बेगमपुरा, सिटीचौक, एमआयडीसी वाळूज, वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.