Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चीनमध्ये २०१९ च्या आधी कोरोनाचा विषाणू नाही , WHO ची स्पष्टोक्ती

Advertisements
Advertisements
Spread the love

चीनमधील वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये करोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला असला तरी, डिसेंबर २०१९ च्या आधी शहरात कोरोना व्हायरसचे कोणतेही संकेत नव्हते अशी स्पष्टोक्ती जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि चिनी तज्ञांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, “डिसेंबर २०१९ च्या आधी येथील लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत. या आधी शहरात कोरोनाचा फैलाव झाल्याचेही कोणते पुरावे सापडलेले नाहीत”. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिले आहे.

Advertisements

दरम्यान कोरोना विषाणूच्या उत्पतीबाबत तपास करण्यासाठी चीनमधील वुहान शहरात पोहोचलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाकडून हि माहिती देण्यात आली आहे. वुहान येथूनच करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते . वुहान येथील प्रयोगशाळेतूनच करोनाचा फैलाव झाला आणि जगभरात पसरला असा दावा केला जात आहे. मात्र WHO यांच्या म्हणण्यानुसार याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

Advertisements
Advertisements

जागतिक आरोग्य संघटनेचे बेन एम्ब्रेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वुहानमधील तपासात करोनासंबंधी अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत, मात्र मोठा बदल झालेला नाही. पथकाला डिसेंबर २०१९ मध्ये वुहान मार्केटबाहेर प्रसार झाल्याचे पुरावे सापडले आहेत अशी माहिती दिली आहे. दरम्यान वुहान किंवा इतर कुठेही डिसेंबर २०१९ पूर्वी करोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचा पुरावा पथकाला सापडला नसल्याचे बेन एम्ब्रेक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
मात्र नेमक्या कोणत्या प्राण्यामुळे करोना संसर्ग झाला यासंबंधी कोणतेही ठोस पुरावे नसल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. वटवाघूळाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या करोनाचं संसर्ग इतर प्राण्याच्या मार्फत माणसांपर्यंत पोहोचल्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. बेन एम्ब्रेक यांनी चिनी वैज्ञानिकांसोबत आपली सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले आहे. यावेळी जागतिक प्रसारमाध्यमे तसेच आपल्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांवरही चर्चा झाली. यावेळी काही वैज्ञानिकांनी हे निराधार असून तपास करताना यामध्ये वेळ घालवता कामा नये असे सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!