वस्ताऱ्याने केला प्राणघातक हल्ला

औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणुन वाळुज भागातील एकतानगर गणी भाई भंगारवाले याच्या दुकानासमोर प्रदिप राजपुत (रा. एकतानगर) याच्या गळ्यावर संतोष ठोकळ (रा. एकतानगर) याने वस्ताऱ्याने वार करून जखमी केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी वस्ताऱ्याने वार करणाऱ्या संतोष ठोकळ याच्याविरोधात एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वजनाचे माप मारून भाजी विक्रेत्याला केले जखमी
औरंगाबाद : मागील भांडणाच्या कारणांवरून किराडपूरा भागातील रोषण मशीदीच्या रस्त्यावर ताहेर खान सरदार खान (रा. शरिफ कॉलनी, रोषण गेट) याची हातगाडी रोडवर पलटी करून भाजीपाल्याचे व गल्ल्यातील पैशांचे नुकसान केले. तसेच वजनाच्या मापाने डोक्यावर, पायावर व पोटोचे बरगडीत मारून जखमी केले. या प्रकरणी ताहेर खान याच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या आमेर खान लाला (वय ३५), लाला हुसैन खान (वय ५५) दोन महिला रा. अराफात मशीदजवळ, कटकट गेट यांना जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.