पोलिसनिरीक्षकाचा श्वान चोरी, गुन्हा दाखल

औरंगाबाद – जातपडताळणी विभागात काम करणारे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांचा सहा महिने वयाचा १०हजार रु.किमतीचा पामेलियन जातीचा पाळीव श्वान कार चालकाने चोरुन नेल्याचा गुन्हा हर्सूल पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
रविराज देविदास पवार(२४) रा.जटवाडागाव असे फिर्यादीचे नाव आहे. रविराज हा पोलिस निरीक्षक पवार यांचा मुलगा आहे. तो स्वता:च्या पेट्रोलपंपावर असल्यामुळे रविराजचा श्वानही त्यांच्या सोबंत होता. डिसेंबर रोजी संध्याकाळी MH20EE5639 हा मारुती कारचालक पेट्रोल भरण्यासाठी आला.व श्वानाला बोलावून कारमधे घेत पळवून नेला.त्यामुळे रविराजपवार हा खूप त्रस्त झाला आहे.हा श्वान कौंटुबिक सदस्य असल्यामुळे पवार कुटुंब या श्वानाची आतुरतेने वाट पहात आहेत या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कायटे करत आहेत