अल्पवयीन मुलीची छेडछाड,सहा महिने कैद, १ हजार रु.दंड

औरंगाबाद – चार वर्षापूर्वी जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीची छेडछाड करणार्या व्यक्तीला जिन्सी पोलिसांनी कोर्टासमोर उभे केले असता कोर्टाने आरोपीस सहा महिने कैद व १ हजार रु दंडाची शिक्षा ठोठावली आहे.पण आरोपीने निकालाच्या विरोधात खंडपीठात दाद मागितली आहे.
दामोदर कन्हैयालाल राबडा(३१)रा.एन७ सिडको असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणात २०१७साली आरोपीला जिन्सी पोलिस ठाण्याचे पीएसआय रफिक शेख यांनी अटक केली होती.एक महिना तुरुंगात राहिल्यानंतर राबडा जामिनावर सुटला होता.त्यानंतर या प्रकरणात साक्षी पुरावे तपासल्यानंतर आरोपी राबडाला शिक्षा सुनावण्यात आली.