दारूचे गोदाम फोडणारा गजाआड, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंंगाबाद : चिंचखेड शिवारातील देशी दारूचे गोदाम फोडून २ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाड्ढया आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मद्देमालासह अटक केली आहे. जबर बुढण पठाण (रा.श्रीपत धामणगांव ता. घनसांवगी ज़ि जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरी केलेले जवळपास दोन लाख रुपये किंमतीच दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहे.
वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाड्ढया चिंचचेडा शिवारातील गट नं ६१ येथे मनोज जैस्वाल यांचे देशी दारूचे गोदाम आहे. या गोदमातून २४ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देशी दारूचे १५५ बॉक्स लंपास केले होते॰ या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना दिले. निरीक्षक फुंदे यांनी तातडीने तपासचक्र फिरवून आरोपी शोधण्यासाठी आपल्या खबड्ढयांना कामाला लावले. तेव्हा विश्वासू खबड्ढयाने माहिती दिली की, सदरचे गोदाम हे कबीर पठाण आणि त्याचा भाऊ जबार पठाण या दोघांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने फोडले या गुन्ह्यातील चोरीला गेलेला माल त्यांच्या घरात लपवून ठेवला. ही माहिती मिळताच फुंदे यांनी तातडीने त्यांच्या पथकाला श्रीपत धामणगांव येथील संशयितांच्या घरावर छापा मारून मुद्देमाल जप्त केला. या वेळी जबार पठाण याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून २ लाख १६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भागवत फुंदे, उप निरीक्षक संदीप सोळुंके, गणेश राऊत, अंमलदार राजेंद्र जोशी, संजय काळे, शेख नदीम, संजय भोसले, बाबसाहेब नवले, गणेश गांगवे, संजय तांदळे आणि योगेश तरमाळे यांनी केली.