Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केली. यासंदर्भात अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचे मलिक यांनी सांगितले. वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार ‘राज्यातील मुस्लिम संसद सदस्य’ या संवर्गातून या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया तेहसीन अहमद खान आणि लोकसभा सदस्य सय्यद इम्तियाज जलील यांना औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येत असल्याबाबत अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!