गळफास घेवून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

औरंंगाबाद : रांजणगांव शेणपुंजी परिसरातील देवगिरीनगर येथे राहणाऱ्या ऐश्वर्या नरसिंग सरवदे (वय १३) या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि.४) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. ऐश्वर्या सरवदे हिने पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार ऐश्वर्याच्या कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी ऐश्वर्याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत ऐश्वर्या सरवदे हिने आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक चेतन ओगले करीत आहेत.