AurangabadCrimeUpdate : पोलिस ठाण्या समोर मंगळसूत्र ७५ हजारांचे हिसकावले

औरंगाबाद -जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर पायी फिरणार्या महिलेचे १७ग्रँ वजनाचे मंगळसूत्र स्कूटीवरुन येणार्या भामट्यांनी संध्याकाळी ७च्या सुमारास हिसकावले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भारती गोविंद कुलकर्णी (४०) रा.मित्रनगर नाथनगर या संध्याकाळी ७ते७`३० च्या सुमारास पायी जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरुन पायी जात असतांना माणिक हाँस्पिटल जवळ पांढर्या स्कूटीवर येत मागे बसलेल्या इसमाने त्यांचे मंगळसूत्र हिसकावले.मंगळसूत्र हिसकावले त्यावेळी पोलिस कर्मचारीही त्या ठिकाणी उपस्थित होते.पण त्यांच्याही लक्षात आले उशीरा ते पळाले मंगळसूत्र चोरांच्या मागू पण चोरट्यांचा वेग जास्ती होता.मंगळसूत्र चोरणार्या इसमाने काळा शर्ट परिधान केल्याचे फिर्यादीने तक्रारित नमूद केले आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलिस करंत आहेत.