विनापरवानगी आंदोलन करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल

औरंंगाबाद : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर किसान बाग आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनाला परवानगी नसतांना देखील आंदोलन केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विभागाचे शहराध्यक्ष डॉ.जमील देशमुख, पश्चिमचे शहराध्यक्ष संदीप शिरसाट, प्रदेश प्रवत्तेâ अमित भुईगळ, अफसर पठाण (रा.नारेगाव), हाफीज इक्बाल अंन्सारी, हाफीस मुश्ताक, शेख साजीद शेख मुनाफ, सर्व रा.जहाँगीर कॉलनी, हर्सूल यांच्याविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बोडखे करीत आहेत.