रेकाॅर्डवरच्या रोहित लोहियाला वेदांतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद – पुणे, नाशिक,अहमदनगर जिल्ह्यात अपहरण आणि खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या रेकाॅर्डवरच्या गून्हेगाराला वेदांतनगर पोलिसांनी शहरातील गुन्ह्यात कोपरगावहून बेड्या ठोकून आणले, रोहित किशोर लोहिया (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे.
डिसेंबर २० मधे पदमपुरा परिसरातील पुष्कर प्रकाश सोनवणे या जुन्या मित्राच्या घरी थांबून चार मोबाईल, लॅपटानप, मोटरसायकल, घड्याळ व रौख रक्कम लंपास केल्याचा गुन्हा वेदांतनगर पोलिस ठाण्यात दाखल होता. रोहित लोहिया हा कोपरगाव शिवारात लपून बसल्याची माहिती. खबर्याने पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक रामेश्वर रौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल कंकाळ यांच्या पथकाने रोहित लोहियाला बेड्या ठोकल्या. वरील कारवाई पोलिसउपायुक्त डाॅ.निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांचाही सहभाग होता. या कारवाईत पोलिस कर्मचारी साळुंके, कांबळे, अंभोरे यांनी सहभाग घेतला होता.
रोहित लोहियाने येवला परिसरात एका तृतीय पंथीयाच्या मदतीने दोन अल्पवयीन तरुणींचे अपहरण करुन २कोटी रु. खंडणी मुलींच्या आई वडलांना मागितली होती. पोलिसअधिक्षक आरतीसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली येवला पोलिसांनी हा गुन्हा काही दिवसांपूर्वीच उघडकीस आणला आहे