#CrimeNewsUpdate : क्षुल्लक कारणावरून वृध्दास भोसकणाीऱ्यांची पोलिस कोठडीत रवानगी

मंदीराची दानपेटी फोडणारा पोलिसांच्या जाळ्यात
औरंंगाबाद : कोकणवाडी परिसरातील तीन देवतांच्या मंदीरातील दानपेट्या फोडून चार हजारांची रोख रक्कम चोरुन नेल्याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी समाधान उर्फ अशोक चांगदेव सोनवणे (वय २५, रा. टिळकनगर ता. सिल्लोड, ह.मु वाळुज ता.गंगापुर) याला शनिवारी रात्री अटक केली. समाधान उर्पâ अशोक सोनवणे याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. कांबळे यांनी रविवारी (दि.२४) दिले.
प्रकरणात मंदीराचे पुजारी महेश माणिकराव डोलारे (वय ४६, रा. केसरसिंगपूरा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, डोलारे हे कोकणवाडी परिसरातील रेणुका मंदीर कालभैरव मंदीर, गणपती मंदीर, विठ्ठल रुक्मणी मंदीर, हनुमान मंदीर आणि महादेव मंदीराचे ट्रस्टी तसेच पुजारी आहेत. एक जानेवारी रोजी डोलारे हे नेहमी मंदीरात पुजा करण्यासाठी आले असता गणपती मंदीर, रेणुका मंदीर आणि विठ्ठल रुक्मणी मंदीरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी रोख चार हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी संदीप वाकळे याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान, त्याने कृष्णा सुरडकर (वय २५) आणि समाधान उर्फ अशोक सोनवण याच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली.
क्षुल्लक कारणावरून वृध्दास भोसकणाीऱ्यांची पोलिस कोठडीत रवानगी
औरंंगाबाद : भावसिंगपुऱ्याकडे जाण्यासाठी दुचाकीला लिफ्ट मागत असताना धक्का लागल्याच्या कारणावरुन वृध्दाच्या पोटात चाकुने भोसकून गंभीर जखमी करणाNया दोघांना गुन्हे शाखेने शनिवारी रात्री अटक केली. शेख बशीर शेख वजीर (वय २१, रा. मुजीब कॉलनी, कटकट गेट) व शेख इम्रान शेख वजीर (वय २०, रा. दानिश पार्क, नारेगाव) अशी आरोपींची नावे असून त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. कांबळे यांनी रविवारी (दि.२४) दिले.
भावसिंगपुरा भागातील नारायण कचरू गवई (वय ५३, रा. भीमनगर) हे मिलकॉर्नरहून घरी जाण्यासाठी २१ जानेवारीला रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास वाहन शोधत होते. त्यावेळी तेथून जाणा-या एका दुचाकीस्वाराला त्यांनी लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवला. मात्र, तेवढ्यातच तेथून दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफक्यू-०३०७) वर जात असलेल्या शेख बशीर व शेख इम्रानला गवई यांच्या हाताचा धक्का लागला. या कारणावरुन दोघांनी गवई यांच्याशी वाद घालून त्यांच्या पोटात चाकुने सपासप वार केले. या घटनेनंतर दोन्ही हल्लेखोरांनी पडेगावच्या कासंबरी दग्र्याकडे धुम ठोकली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेने सीसीटिव्ही फुटेज आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
सिडकोत महिलेचा विनयभंग
औरंंगाबाद : सिडको परिसरातील सह्यादी नगर भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेचा शेख रफिक उर्फ व्हाईटनर (रा.चिश्तीया कॉलनी) याने विनयभंग केला. ही घटना २३ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. आविष्कार चौकातून शेख रफिक उर्फ व्हाईटनर हा चिप्स खात जात होता, त्यावेळी घरासमोर उभ्या असलेल्या पीडित महिलेला त्याने चिप्स खाती क्या असे म्हणत तिच्याशी लगट करीत विनयभंग केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात शेख रफिक उर्पâ व्हाईटनर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून दोन मोबाईल चोरले
औरंगाबाद : सिडको परिसरातीाल पवननगर भागात राहणाNया तक्रारदार महिलेच्या घरातून चोरट्याने बारा हजार रूपये विंâमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना १३ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासऱ्याच्या घरावर जावयाने केला कब्जा
औरंगाबाद : पडेगाव भागात राहणाऱ्या लिमचंद्र बालु पवार (वय ६०) हे त्यांच्या गावी काही कामानिमित्त गेले होते. लिमचंद्र पवार हे गावी गेल्याचा फायदा उचलून त्यांचा जावई दिनेश गुलाब जाधव (रा. विर गावनता मंठा) याने घराचा कुलूप तोडून घराचा ताबा घेतला. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लिमचंद्र पवार यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी २३ जानेवारी रोजी छावणी पोलिस ठाण्यात जावई दिनेश गुलाब जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकने दिली धडक
औरंगाबाद : बीड बायपास रोडवर गोदावरी टि पॉईंटजवळ २२ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक क्रमांक (एमएच-२१-बीएच-१३६६) ने समोरील ट्रक क्रमांक (एमएच-४०-बीएन-८६८२) ला धडक दिली. या धडकेत समोरील ट्रकचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ट्रक चालक रामचंद्र बोंडकु ब्राम्हणकर (वय ४७, रा. नागपूर) याच्या फिर्यादीवरून राजु भाऊसाहेब राजापुरे याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच, चार दुचाकी लंपास
औरंंगाबाद : शहरात दुचाकी वाहन चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून आणखी चार दुचाकी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाढत्या वाहन चोNयामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
कृष्णा वैजीनाथ घुले (वय २५, रा. ह.मु. समर्थनगर ) याची दुचाकी क्रमांक (एमएच-२१-बीसी-६३१९) ही २२ जानेवारी रोजी रात्री चोरटयाने समर्थनगर भागातील स्वागत बिल्डींग समोरील पार्किंगमधुन चोरून नेली. कलीम हकीम देशमुख (वय २४, रा. उमर कॉलनी, हर्सुल) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एआर-९३७३) ही एमजीएम हॉस्पीटलच्या पार्कींगमधुन १८ जानेवारी रोजी दुपारी चोरटयाने चोरून नेली. ओंकार आनंदराव गडदे (वय २५, रा. सुमीत गोल्ड प्लाझा, बीडबायपास) यांच्या घरासमोरून दुचाकी क्रमांक (एमएच-३८-टी-५०९२) ही चोरटयाने चोरून नेली. आतीष शिवाजी काजळे (वय २०, रा. जोगेश्वरी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएम-५०१०) ही चोरटयाने १३ जानेवारी रोजी रात्री शेतातून चोरून नेली.
शहराच्या विविध भागातून दुचाकी लंपास करणाNया चोरट्याविरूध्द अनुक्रमे क्रांतीचौक, सिडको, पुंडलिकनगर, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.