दारु पिण्यास जागा देणाऱ्या हॉटेलचालकासह ७ जणांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील हॉटेल राणीबागमध्ये विनापरवाना अवैधरित्या दारु पिण्यासाठी जागा देणाऱ्या हॉटेल चालकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सोमवारी (दि.२५) कळवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन सुभाषराव देशमुख (कैलासनगर), राजू पटेल (रा. धरती धनसोसायटी, तुळजाई नगर, सुरेश कैलास पाटील (जवाहरनगर), संदीप पाटील (रा. त्रिमुर्ती चौक), आदीनाथ महानोर (रा. एन-४), संतोष संजय कासार (रा. टीव्ही. सेंटर), सिद्धार्थ नाना पाथरे (रा. त्रिमुर्ती चौक, बौद्ध नगर) अशी हॉटेलमध्ये बसून दारू पिणाऱ्यांची नावे आहेत. उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर नवले, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनाजी आढाव, पोलिस अंमलदार बाळाराम चौरे, चंद्रकांत पाटील, दिपक जाधव, रवी जाधव, राजेश यदमळ, जालींदर मांन्टे, प्रवीण मुळे, अजय कांबळे, नलावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. हॉटेलमध्ये बसून दारू पिणाNयाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.