राज्यात आज ४७७ लसीकरण सत्र; ३५ हजार ८१६ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण

ज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ वर्धा, भंडारा, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. आजपासून लसीकरण सत्राला सुरवात झाली. उद्या मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र होईल. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.
ही आकडेवारी आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ७०१ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात आज २६५ जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली आहे.
आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या) :
अकोला (327, 65 टक्के, 1433), अमरावती (857, 86 टक्के, 3243), बुलढाणा (804, 80 टक्के, 2921), वाशिम (442, 88 टक्के, 1573), यवतमाळ (355, 71 टक्के, 2143), औरंगाबाद (816, 48 टक्के, 3959), हिंगोली (237, 79 टक्के, 1573), जालना (760, 95 टक्के, 2445), परभणी (275, 55 टक्के, 1597), कोल्हापूर (1097, 55 टक्के, 4601), रत्नागिरी (487, 52 टक्के, 1942), सांगली (1326, 78 टक्के, 4065), सिंधुदुर्ग (354, 59 टक्के, 1264), बीड (746, 83 टक्के, 3008), लातूर (974, 75 टक्के, 3081), नांदेड (385, 43 टक्के, 2062), उस्मानाबाद (319, 106 टक्के, 1620), मुंबई (1858, 64 टक्के, 6624), मुंबई उपनगर (3147, 93 टक्के, 10540), भंडारा (565, 113 टक्के, 1803), चंद्रपूर (392, 65 टक्के, 2569), गडचिरोली (645, 92 टक्के, 2215), गोंदिया (530, 88 टक्के, 1797), नागपूर (1344, 61 टक्के, 6111), वर्धा (1315, 120 टक्के, 3960), अहमदनगर (1334, 64 टक्के, 5240), धुळे (864, 144 टक्के, 2755), जळगाव (867, 67 टक्के, 3437), नंदुरबार (347, 50 टक्के, 1822), नाशिक (1517, 66 टक्के, 5991), पुणे (2903, 65 टक्के, 11,188), सातारा (1419, 101 टक्के, 4891), सोलापूर (967. 51 टक्के, 5570), पालघर (1016, 85 टक्के, 2606 ), ठाणे (3904, 95 टक्के, 13,109), रायगड (321, 40 टक्के, 1303)
राज्यात सहा ठिकाणी कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात आज 80 जणांना, पुणे येथे 35, मुंबई 34, नागपूर 68, कोल्हापूर 26 आणि औरंगाबाद 22 असे 265 जणांना ही लस देण्यात आली.