अल्पवयीन तरुणांनी केला खुनाचा प्रयत्न, दोघांची सुधारगृहात रवानगी

औरंगाबाद – बंबाटनगरात दोन अल्पवयीन तरुणांनी २१वर्षीय तरुणाला काल रात्री १०.३० (२२/१)वा. किरकोळ कारणावरुन चाकुने भोसकले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आज संध्याकाळी ७वा. दाखल झाला आहे.
एक १६वर्षाचा व एक १४वर्षाचा असे गुन्हेगारांचे वर्णन असून बंबाटनगरात राहूल पंडीत नावाच्या तरुणाला दोघांनी पोटावर चाकुचे वार करुन भोसकले. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुळे करंत आहेत