तडीपारीचा प्रस्ताव लालफितीत अडकलेल्या स्टायलो चा जिन्सी पोलिसांना घर फोडून दणका,पोलिसांनीही अटक करत मुद्देमाल केला जप्त

औरंगाबाद – तडीपारीचा प्रस्ताव लालफितीत अडकलेल्या स्टायलो ने बायजीपूर्यात डाॅक्टरचे घर फोडून ११तोळे सोने लंपास केले होत. त्या पैकी ८तोळे सोने जप्त करंत जिन्सी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. एकूण ४लाख ४७ हजारांच मुद्देमाल जप्त केला असून स्टायलो ला ४दिवसांची पोलिस कोठडी मिळवली.
सय्यद समीर पिता सय्यद शौकत उर्फ स्टायलो(२३) रा.बायजीपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे. आॅक्टोबर २० मधे जिन्सी पोलिसांनी स्टायलो चा तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवलेला आहे.पण स्टायलो चा प्रस्ताव कुठेतरी धुळ खात पडल्यामुळे स्टायलो ने तेवढ्यात बायजीपुर्यातील रहिवासी डाॅक्टर अय्युबखान पिता दबीर खान(५०) यांचे एक आठवडा बंद असलेले घरफोडून ११तोळे सोने लंपास केले होते.या गुन्ह्याचे सी. सी.टिव्ही फुटेजमुळे गुन्हा उघडकुस आला.त्यापैकी जिन्सी पोलिसांनी स्टायलो कडून ८तोळ्यांचे दागिने जप्त केले.स्टायलो ने एका विधीसंघर्ष चोरट्याच्या मदतीने वरील गुन्हा केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले. वरील कारवाई पोलिस उपायुक्त दिपक गिर्हे व पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय साईनाथ गिते,पीएसआय दत्ता शेळके,पोलिस कर्मचारी संपत राठोड, शेख गणी, हारुण शैख संजय गावंडे यांनी पार पाडली.