ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या उत्साहात देशी दारुची अवैध वाहतूक,अडीच लाखांच्या मुद्देमालासह एक अटक

औरंगाबाद – राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारुची कारमधून जटवाडा रस्त्यावर अवैध वाहतूक करणार्या इसमाला अटक केली. ५०हजारांची दारु,आणि २लाख रु.ची कार असा ऐवज जप्त केला आहे.
फुलंब्री तालुक्यातील हिवर्या चा रहिवासी पुंडलिक रयाजी रहाटे असे अटक आरोपीचे नाव आहे. खबर्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती दिल्यानंतर वरील कारवाई पार पडली. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक चव्हाण, दुय्यम निरीक्षक मातकर, महेंद्रकर, शेंदरकर यांनीही सहभाग घेतला होता.