राज्यकर आयुक्तालयाची कारवाई २२५ बोगस कंपन्याचे भांडाफोड

औरंगाबाद – राज्यातील २५तर राज्याबाहेरील २००व्यापार्यांनी मोबाईल क्र. इमेल आयडी खोटी कागदपत्रे वापरुन १००कोटी रु.ची खोटी बिले निर्गमित केल्याचे राज्यकर कार्यालयाच्या निर्दशनास आले.या मधे शहरातल्या सात कंपन्यांचा समावेश आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली.
पूर्ती कंन्र्स्टक्शन, मे. इंद्र ट्रेडस, विधाता मेटल्स,सृष्टी इम्पेक्स, विधी एंटरप्राईजेस, जय गणेश कार्पोरेशन, एम.के. एंटरप्राईजेस या कंपन्यांचा समावेक्ष आहे.या कंपन्यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे जीएसटी क्रमांक प्राप्त केल्याचे राज्यकर आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
सदर कारवाई ही सहआयुक्त आर. एस. जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र जोगदंड,मकरंद कंकाळ , धनंजय देशमुख या अधिकार्यांनी पार पाडली