तोतया पोलिसाने कामगाराला लुबाडले

औरंगाबाद : वाहतूक पोलीस असल्याची बतावणी करुन सिग्नल तोडल्याचे सांगून दुचाकी अडवत दोन तोतयांनी कामगाराला लुबाडल्याची घटना ६ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एएस क्लबजवळ घडली. या प्रकरणी आज (१२/०१) रोजी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केशव बळीराम ढगे (३०, रा. कृष्णानगर, रांजणगाव शेणपुंजी) हे रात्री दुचाकीने (एमएच-२०-एफएस-५१४५) घराकडे जात होते. त्यांना एएस क्लब सिग्नलवर दोन तोतया वाहतूक पोलिसांनी अडवले. यावेळी दोघांनी दुचाकी बाजूला घ्यायला सांगत चावी काढून घेतली. त्याचवेळी एकाने वाहतूक पोलीस असून, तुला सिग्नल दिसत नाही का असे धमकावून खिशातील मोबाइल व पाकीट काढून घेतले. या दोन्ही वस्तू साथीदाराजवळ दिली. तर प्लास्टिकची काठी ढगेजवळ देऊन मित्राला सोडून येतो अशी थाप मारुन ढगेची दुचाकी देखील लुबाडून नेली. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज औद्योगिक पोलिस करंत आहेत.