सिडको पोलिसांची कामगिरी ; आठ वर्षापासुन फरार असलेला कंबर ऊर्फ डंपर पुण्यातून अटक

औरंगाबाद – २०१२-१३साली सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकलवर मंगळसूत्र चोर्या करणाला कंबर उर्फ डंपर शाहजान जाफरी(३४) रा.लोणी काळभोर पुणे याला येरवडा परिसरात सापळा लावून सिडको पोलिसांनी पकडून आणले.
आठ वर्षांपूर्वी सिडको परिसरात मंगळसूत्र चोर्या करणारा डंपरच असून तो सोमवारी येरवडा परिसरात येणार आहे अशी माहिती खबर्याने पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना दिली.त्यानुसार रविवारी रात्री वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीने पोलिस उपधिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिसांचे पथक येरवडा परिसरात दबा धरुन बसले होते. सोमवारी संध्याकाळी ७.२०च्या सुमारास डंपर येरवडा परिसरात येताच त्याला झडप घालून पकडण्यात आले.
वरिल कारवाई पोलिसउपायुक्त दिपक गिर्हे व पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब आहेर, स्वप्नील रत्नपारखी, नरसिंग पवार यांनी पार पाडली.