इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळले, ६२ जण मरण पावल्याची भीती

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाने शनिवारी उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच ते समुद्रात कोसळले. या विमानातील प्रवासी, कर्मचाऱ्यांसह ६२ जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Sriwijaya Air flight #SJ182 lost more than 10.000 feet of altitude in less than one minute, about 4 minutes after departure from Jakarta.https://t.co/fNZqlIR2dz pic.twitter.com/MAVfbj73YN
— Flightradar24 (@flightradar24) January 9, 2021
इंडोनेशियाच्या हवाई खात्याच्या प्रवक्त्याने सांगितल्या प्रमाणे, श्रीविजया एअर कंपनीच्या ७३७ बोईंग प्रवासी विमानाने शनिवारी दुपारी १.५६ ला जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरून पोंटियानासाठी उड्डाण केले होते. यात ५६ प्रवासी व सहा कर्मचारी होते. नियंत्रण कक्षाशी संपर्क होता तेव्हा विमान ११ हजार फुटांवर होते. अवघ्या ४ मिनिटात विमान १० हजार फूट खाली येऊन समुद्रात कोसळले. माहिती मिळताच नेवीच्या गोताखोरांसह आता १० हून अधिक जहाजे साइटवर तैनात करण्यात आली आहेत.
उत्तर जकार्ताच्या परिसरात १०० छोटी बेटे आहेत. तेथील समुद्रात काही गोष्टी तरंगताना स्थानिक मच्छिमारांना आढळल्या. ते विमानाचे अवशेष असावेत, अशी चर्चा आहे. अद्याप याला इंडोनेशिया सरकारने दुजोरा दिलेला नाही. या विमानाच्या सुरक्षेबाबत पूर्वीपासूनच प्रश्न उपस्थित होत आलेले आहेत. इतकेच नाही, तर या वादानंतर बोइंग या विमानाचे उत्पादन बंद करण्याबाबत विचार करत असल्याचेही वृत्त आहे.