क्राईम ब्रॅंच ने गुन्हा उघडकीस आणला,मुद्देमालासह दोन चोरटे अटक

औरंगाबाद – सिडको पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी दाखल असलेला चोरीचा गुन्हा क्राईमब्रॅंचने उघडकीस आणंत ७ग्रॅम सोने जप्त करंत दोघांना अटक केली आहे.
तारासिंग विठ्ठल नमरोट (२६) रा. मिसारवाडी आणि एकनाथ गंगाधर शिंदे रा. जनूना ता.बुलढाणा अशी अटक आरोपींची नावे आहेत.खबर्याने एपीआय मनोज शिंदे यांना वरील आरोपींबाबत ठावठिकाणा सांगताच गुन्हे शाखेने वरील दोघांच्या मुस्क्या आवळल्या. पुढील कारवाईसाठी गुन्हे शाखेने आरोपींना सिडको पोलिसांच्या हवाली केले आहे.