अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

file pic
औरंगाबादमध्ये पोटच्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वडिलांना पोक्सो आणि भादंविच्या विविध कलमांखाली २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एकूण ५६ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी शनिवारी (दि.२) सुनावली.
शहरातील पीडित मुलीने २६ जानेवारी २०१८ रोजी ४६ वर्षीय पित्याने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोक्सो कायद्यान्वये व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडिता ही आई-वडील व भावासह औरंगाबाद शहरातत राहते. तर तिची मोठी बहीण आजीकडे राहते. घटनेच्या दिवशी पीडिता जेवण करून घरातच पलंगावर झोपली असता वडिलांनी जवळ येऊन तोंड दाबत अत्याचार केला. यापूर्वीही पीडितेवर अ्त्याचाराचा प्रयत्न आरोपी पित्याने केला होता. मात्र, तेव्हा मोठ्या बहिणीने पित्याला काठीने मारून बाजूला केले होते. मात्र, घटनेच्या दिवशी मोठी बहीण घरात नव्हती. ती आजीकडे कन्नडला होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडितेने वडीलांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे आईला सांगितले. आई व शेजार्यांसोबत जाऊन पीडितेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पित्याविरूध्द भादंवि व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.