Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : जिन्सी पोलिसाने मुख्यालयातील पोलिस कर्मचार्‍याला बदडले

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – वाहन पार्किंग च्या कारणावरुन जिन्सी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शेख उस्मान यांनी पत्नीला सोबंत घेत मुख्यालयातील कर्मचारी केशव जाधव यांना कार पार्किंग च्या कारणावरुन मुलाच्या इशार्‍यावरुन मारहाण केली.या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुत्राला अटक करण्यात आली आहे.

Advertisements

पोलिसउपायुक्त मिना मकवाना यांच्या तोंडी आदेशावरुन पोलिसआयुक्तालयासमोरील पोलिस वसाहतीत मुख्य रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करु द्यायचे नाही असा आदेश असल्यामुळे पोलिस कर्मचारी जोसेफ डॅनियल,यशवंत गायकवाड आणि केशव जाधव हे वसाहतीमधील सर्व प्रश्न हाताळतात.आज सकाळी जिन्सी पोलिस ठाण्याचे कर्मचारी शेख उस्मान यांचा पुत्र वसीम याने रस्त्यावर कार लावल्रामुळे केशव जाधव यांनी वसीम ला कार पार्किंग मधे लावण्याचे सांगताच वसीम ने कार मधून उतरंत केशव जाधव यांच्या कानशिलात भडकावली हा प्रकार शेख उस्मान वरुन पाहात असतांना वसीम ने त्यांना इशारा करुन खाली बोलावले जाधव यांना पाहण्यास सांगितले.म्हणून शेख उस्मान व त्यांची पत्नी मीनाज यांनी केशव जाधव यांना मारहाण केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा पोलिस करंत आहेत

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!