AurangabadCrimeUpdate : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक, न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

औरंंंगाबाद : मोबाइलचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी वारंवार होणाNया छळा कंटाळून विवाहीतेने गळफास घेत आत्महत्या केली होती. विवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपी पतीला सातारा पोलिसांनी शनिवारी (दि.२६) पहाटे गजाआड केले. मिर्झा असलम बेग सफदर बेग (वय २७, रा. सादातनगर) असे आरोपीचे नाव असून त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी दिले.
प्रकरणात मयत रूफैदा यांचे वडील तफज्जूल महेमूद हुसेन खान (वय ६२, रा. रशिदपुरा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, रुफैदा यांचा विवाह ९ नोव्हेंबर २०१९ रोजी आरोपी मिर्झा असलम बेग याच्याशी झाला होता. लग्नाच्या महिन्यांभरानंतर रुफैदाला तिच्या पतीसह सासू नफिसा, नणंद सलमा बेगम आणि मोठा भाया उबेद बेग हे छोट छोट्या कारणावरून भांडण करुन तुझ्या वडीलांनी लग्नात काही दिले नाही म्हणून शिवीगाळ करित होते. वारंवार होणा-या त्रासामुळे मार्च २०२० मध्ये फिर्यादी व आरोपींची बैठक झाली. तेंव्हा आरोपी मिर्झा अस्लम आणि त्याचा मोठा भाउ मिर्झा उबेद यांनी मोबाइलचे दुकान टाकण्यासाठी दोन लाखांची मागणी केली.
फिर्यादी ऐवढे पैसे नसल्याचे सांगत ५० हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा आरोपींनी मोबाइल दुकान टाकण्यासाठी दोन लाख रुपये आण असा पुन्हा तगादा लावत विवाहीतेचा छळ सुरु केला. त्यामुळे २० डिसेंबर रोजी फिर्यादी यांच्या भावाच्या घरी फिर्यादी व आरोपींची बैठक झाली. त्यात फिर्यादी यांनी दोन महिन्यांत तुम्हाला पैसे देतो, मात्र मुलीचा छळ करु नका असे सांगितले असता आरोपींनी ते मान्य केले. मात्र, २५ डिसेंबर रोजी दुपारी पीडितेने फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोबाईलसह रक्कम हडपणा-या व्यवस्थापकाच्या पोलिस कोठडीत वाढ
औरंंंगाबाद : सिलेक्ट गॅजेट एलएलपी कंपनीच्या शोरुमधून २२ मोबाइलसह २० हजार रुपये हडपणाNया मॅनेजरच्या पोलीस कोठडीत २८ डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी (दि.२६) दिले. अस्कर अली मिर्झा अख्तर अली बेग (वय ३५, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
नागराज लोकनाथन (वय ४३, रा. वरशिगोडा सिकंदराबाद) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी अस्कर अली हा सेलेक्ट गॅझेट एलएलपी कंपनीच्या शोरुममध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होता. आरोपीच्या मोठ्या भावाला ब्लड कॅन्सर असल्याने त्याला नेहमी पैशांची आवश्यकता भासत होती. त्याने शोरुम मधुन विक्री झालेल्या जवळपास २२ मोबाईलचे पैसे व रोख रक्कम २० हजार रूपये हडप केली होती. दरम्यान, २३ नोव्हेंबर २०२० रोजी कंपनीचे ऑडीटर नागराज लोकनाथन यांनी केलेल्या ऑडीट केले असता २२ मोबाइल कमी व वीस हजार रुपये कमी असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पेठेनगरात घरफोडी करणा-याची हर्सूल कारागृहात रवानगी
औरंंंगाबाद : घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख तीन हजार रुपये असा सुमारे ३१ हजार १३५ रुपयांचा ऐवज चोरणाNया सलमान इसा कुरेशी (वय २८, रा. चितेगाव ता. पैठण) या चोरट्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी (दि.२६) दिले. त्याला २२ डिसेंबर रोजी छावणी पोलिसांनी अटक केली.
वैशाली केशव बोंदले (वय ३८, रा. कमलनयन हौ.सो, पेठेनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, वैशाली बोंदले यांचे भाउ जयेश हा घराला कुलूप लावुन बाहेर गेले होते. ३० नोव्हेंबर रोजी रात्री वैशाली बोंदले यांनी झोपण्यापूर्वी घराचे कुलूप लावुन व्यवस्थीत लावले आहे का याची पाहणी केली व झोपण्यासाठी गेल्या. दुसNया दिवशी पहाटे त्यांना भावाच्या घराच्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.