AurangabadCrimeUpdate : दागिने विक्रीसाठी आलेला चोर पोलिसांच्या जाळ्यात, दोन घरफोड्या उघडकीस, शंभर टक्के रिकव्हरी

औरंगाबाद : सिडको परिसरात पाच महिन्यांपूर्वी दोन घरफोड्या करुन साडेपाच तोळे सोने ज्याची किंमत २ लाख ७५ हजार रु.आहे.हा ऐवज लंपास करणारा भूरटा चोर सिडको पोलिसांनी मुद्देमालासह विक्रीसाठी आला असतांना काल २४ डिसें रोजी पकडला. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके यांनी गणेश जनार्दन अडागळे(२९) रा. छोटा मुरलीधरनगर या भुरट्या चोराला टि.व्ही. सेंटर चौकात चोरीचे सोने विक्रीसाठी आलेला असतांना पकडले. आज २५ /१२ रोजी आरोपीच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी अडागळेवर हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.या पूर्वी आरोपी हा भुरट्या चोर्या करंत असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले. या कारवाईत पीएसआय बुधा शिंदे,पोलिस कर्मचारी नरसिंग पवार, सुभाष शेवाळै,सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी यांनीही सहभाग घेतला होता.