IndiaNewsUpdate : कोरोना लस घेण्यावरून भारतीय मुस्लिम समाजात का होतो आहे वाद -विवाद ?

जगभर कोरोना लसींची चर्चा चालू असताना या लसीवरून वेगळाच वाद भारतात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत . त्याचे कारण असे आहे कि , कोरोनाची लस अंतिम टप्प्यात असताना यामध्ये डुक्कराच्या चरबीचा वापर करण्यात येत आहे असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. यावरुन सध्या अनेक मुस्लिम देशांत वाद सुरु आहे. या वादावर स्पष्टीकरण देताना संयुक्त अरब अमिराती म्हणजेच ‘युएई’ ने मात्र जीवनाला महत्व देताना , डुक्कराच्या मांसाच्या अशांचा वापर करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिली असताना भारतातील मुस्लिम संघटनांनी मात्र त्याला विरोध दर्शविला आहे.
मुंबईत बुधवारी झालेल्या ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमा या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जर कोरोना लसीत डुक्कराच्या मांसाच्या अंशाचा वापर करण्यात आला असेल तर त्याची कल्पना सरकारनं आधीच द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुस्लिमांमध्ये डुक्कराच्या मांसाला ‘हराम’ मानलं जातं, त्यामुळे कोरोनाच्या लसीमध्ये जर त्याचा वापर करण्यात आला असेल तर अशा लसीच्या वापराला इस्लाम मान्यता देत नाही. कोरोनाच्या लसीमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची माहिती सरकारने आधीच द्यावी असा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला आहे.
या वादावर स्पष्टीकरण देताना युएईच्या फतवा कौन्सिलचे अधयक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या यांनी म्हटले आहे कि , कोरोना व्हायरस हा संपूर्ण मानव समाजाला धोकादायक असल्याने इस्लामचे तत्वज्ञान यापासून दूर ठेऊन मनुष्याचं जीवन वाचवण्याला प्राधान्य दिलं जाईल असा निर्णय फतवा कौन्सिलमध्ये घेण्यात आला आहे.
दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या भारतात एक कोटीच्या वर गेली असून त्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी भारतासह सर्व जगाला कोरोनावरील लसीची प्रतीक्षा असतानाच भारतात हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याच विषयावर मंगळवारी मुंबईत ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमा या संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अशा प्रकारची लस मुस्लिमांनी वापरणे निषिध्द असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे समाजाच्या मौलवींशी सरकारने आधी चर्चा करावी आणि मगच ही लस वापरायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
युएई फतवा परिषदेची मात्र पोर्क-जिलेटिनच्या वापराला मान्यता
जगभरातीळ मुस्लिम राष्ट्रांमध्ये या प्रश्नावरुन वाद-विवाद सुरु असताना संयुक्त अरब अमिरातीमधील देशांनी मात्र डुक्कराच्या मांसाचा अंश (पोर्क-जिलेटिन) असणाऱ्या कोरोनाच्या लसीच्या वापराला मान्यता दिली आहे. युएईच्या फतवा परिषद या सर्वोच्च इस्लामिक संघटनेनं याच्या वापराला मान्यता देताना म्हटले आहे कि , डुक्कराच्या उत्पादनाच्या वापराचा इस्लाममध्ये हराम मानण्यात आले असले तरी मनुष्याचा जीव वाचवण्यासाठी या लसीला प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे कोरोना लसीच्या बाबतीत इस्लामची तत्वे बाजूला ठेवून या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात येत असल्याचं या परिषदेनं म्हंटलं आहे.
कोरोनाच्या या लसीत डुक्कराच्या मांसाच्या जिलेटिनचा वापर केला असल्याने युएईतील मुस्लिम नागरिकांची चिंता वाढली होती. इस्लाममध्ये कोणत्याही उत्पादनात पोर्कचा वापर निषिध्द मानला जातो. त्यामुळे या लसीचा वापर करावा का यावर बरीच चर्चा करण्यात येत आहे. फतवा कौन्सिलच्या या निर्णयाची माहिती देताना अधयक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या म्हणाले की, जर कोणताही पर्याय नसेल तर कोरोना लसीमध्ये डुक्कराच्या मांसाच्या वापराला इस्लामच्या तत्वज्ञानापासून वेगळं ठेवलं पाहिजे. अशा वेळी पहिली प्राथमिकता ही नागरिकांच्या जीवनाचे संरक्षण करण्याची असेल. या पोर्क-जिलेटिनचा वापर खाण्यासाठी न करता औषधांच्या स्वरुपात केला जाणार असल्याने त्याला काही आक्षेप घेण्याचं कारण नाही.