AurangabadCrimeUpdate : सातारा पोलिसांची रिकव्हरी, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे आणले उघडकीस

औरंगाबाद – गेल्या दोन महिन्यात पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संतोषीमातानगर आणि विशाल नगरातून दोन मोटरसायकल चोरुन विक्री करण्याच्या प्रयत्नात असणार्या चोरट्याला सातारा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. संदीप नारायण काळे (२३) रा. सातारागाव असे अटक आरोपीचे नाव आहे. वरील दोन्ही मोटरसायकलचोरीचे गुन्हे पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. १४नोव्हेंबर रोजी शिला वाहुळे यांची अॅक्टीव्हा आणा मनसुराम प्रसाद यांची होंडा मौटरसायकल चोरी केल्याची कबुली चोरट्याने पोलिसांना दिली आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अरविंद चव्हाण, संतोष मोळके, अजित लोंढे यांनी पार पाडली