AurangabadCrimeUpdate : पैसे देण्यास नकार दिल्याने देहविक्रय करणाऱ्या महिलेचे डोके फोडले , ऑटो रिक्षाचालकास अटक

औरंगाबाद – रविवार असल्याने तुझ्याकडे अधिक पैसे आल्याने “मलाही दारु पिण्यासाठी पैसे दे ” म्हणून मागणी करणाऱ्या ओळखीच्या रिक्षाचालकास पैसे देण्यास नकार दिल्यामुळे देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला जखमी केल्याची घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले कि , रविवारी दुपारी हि घटना घडली . शेख शाहरुख शेख फरीद रा. बायजीपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला ही आरोपीच्या घनिष्ठ ओळखीची असून आरोपी या महिलेला सतत तिच्या व्यवसायात ग्राहक ने आण करण्यासाठी मदत करत असतो. दरम्यान रविवारी धंदा चांगला झाल्यामुळे ओळखीच्या महिलेला शेख शाहरुख ने पैशे मागताच ती भडकली त्यामुळे अपमानित झालेल्या शाहरुख ने महिलेच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत