AurangabadCrimeUpdate : छावणीतील फलकाची तोडफोड करणारा मद्यपी गजाआड

औरंंंगाबाद : छावणी परिसरातील नेहरू उद्यानात दारू पिण्यासाठी बसू न दिल्याच्या रागातून मद्यपीने उद्यानाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून उद्यानाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेल्या फलकाची तोडफोड केली होती. याप्रकरणी छावणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सुरक्षा रक्षकाला मारहाण करून फलकाची तोडफोड करणा-या मद्यपीला छावण्ीा परिसरातील तोफखाना परिसरातून मंगळवारी गजाआड केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू काळे (रा.तोफखाना परिसर, छावणी ) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फलकाची तोडफोड करणा-या मद्यपीचे नाव आहे. विष्णू काळे हा दारू पिण्याच्या सवयीचा असून सोमवारी रात्री तो दारू पिण्यासाठी छावणी परिसरातील उद्यानात गेला होता. त्यावेळी उद्यानाच्या सुरक्षा रक्षकाने येथे बसून दारू पिऊ नको असे म्हणत विष्णू काळे याला उद्यानाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विष्णू काळे याने जवळच पडलेला लाकडी दांडा घेवून उद्यानाच्या सुरक्षा रक्षकास मारहाण केली. तसेच उद्यानाच्या दर्शनी भागात लावलेल्या आय लव्ह औरंगाबाद या फलकाची तोडफोड केली होती. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी छावणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात विष्णू काळे याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने फलकाची तोडफोड केली असल्याची कबूली पोलिसांना दिली.
रिक्षातून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणारा जेरबंद
औरंंंगाबाद : ाोडिंग रिक्षातून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणा-यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने जेरबंद केले. सय्यद मुस्तफा सय्यद साहेब अली ( वय ३९, रा.सिकंदर कॉलनी,मिसारवाडी) असे लोडिंग रिक्षातून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणा-याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून रिक्षा, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा असा एकूण ४ लाख ७२ हजार ७६० रूपये विंâमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखून्य पदार्थ, पान-मसाला, सुगंधी तंबाखू, गुटखा आदीची हर्सूल परिसरातून रिक्षातून वाहतूक होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर व हर्सुल पोलिसांनी हर्सुल टी पॉईन्ट चौकात रिक्षा क्रमांक (एमएच-२०-डीई-७१४८) अडविला. पथकाने सय्यद मुस्तफा सय्यद साहेब अली याला ताब्यात घेत रिक्षाची झडती घेतली असता, रिक्षात १ लाख ७६ हजार ४०० रूपये किमतीचे रजनीगंधा पान-मसाल्याचे ९८ बॉक्स, ९६ हजार ३६० रूपये किमतीचे तुलसी जाफरानी जर्दाचे २२० पाकीट मिळून आले. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांच्या तक्रारीवरून हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.