MumbaiNewsUpdate : एकाच कुटुंबातील तिघांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू , १० वर्षीय बालिका बचावली

मुंबईतील नालासोपारा भागात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वेरुळावर आढळून आले असून, या कुटुंबातील एक १० वर्षांची मुलगी मात्र गंभीर जखमी झाली आहे. नालासोपारा ते वसई लोहमार्गावर नालासोपारा स्थानकाजवळ ही ही घटना घडली. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचं दिसत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, मालगाडीसमोर चौघांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Maharashtra: Three dead & one injured in a freight train accident near Nala Sopara Railway Station, earlier today.
"Prima facie, it seems to be an accident. We have registered a case. The deceased were residents of Virar area. Probe underway," says Police. pic.twitter.com/Ivo1n73PY0
— ANI (@ANI) December 19, 2020
पोलिसांच्या माहितीनुसार फिरायला जात असल्याचे सांगून आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हे चौघे घरातून निघाले होते. त्यानंतर पावणेसातच्या सुमारास या सर्वांनी वसई व नालासोपारा स्थानकांदरम्यान मालगाडीखाली झोकून दिले. वसईत उतरून रूळांवरून चौघेही चालत नालासोपाऱ्याच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे. हे पाऊल उचलण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोमनाथ पोपट जंगम यांचा मसाले विक्रीचा व्यवसाय होता इतकीच माहिती हाती आली असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
या घटनेत सोमनाथ पोपट जंगम (वय ३१), नंदा पोपट जंगम (वय ५५) आणि प्रेमिला पोपट जंगम (वय ३५) हे जागीच ठार झाले तर समीक्षा फडतरे ही दहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. मालगाडीखाली चिरडले गेल्यानं तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले. रेल्वे पोलिसांनी तिन्ही मृतदेह आणि जखमीला रुग्णालयात हलवले. मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, मयत विरारमधील पूर्व साईनाथ नगर येथील रहिवाशी आहेत. दरम्यान प्रथमदर्शनी ही घटना अपघात असल्याचं दिसून येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विरारमधील रहिवासी असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली असावी, असा संशय वसई रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.