AurangabadCrimeUpdate : विहीरीचे पाणी देण्यावरुन काकाचा खून, पुतण्याला बेड्या

औरंगाबाद – दौलताबाद परिसरात गट नं१२मधे आज दुपारी १च्या सुमारास सामाईक विहीरीचे पाणी शेतीला देण्याच्या वादावरुन पुतण्याने काकाच्या डोक्यात फावडे घालून जागेवरंच जीव घेतला.दौलताबाद पोलिसांनी पुतण्याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर कुशीनाथ काळे (३०) असे अटक आरोपीचे नाव आहे.तर सुभाष त्रिंबक काळे (५५) असे मयताचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि , काका पुतण्याची शेतात सामाईक विहीर आहे.गूल्या २५ते ३० वर्षापासून आळीपाळीने काका पुतणे आपापल्या पिकाला पाणी देत असंत यावेळी छोटे मोठे वादही होत होते. आज (१२/१२) दुपारी १वा. आरोपी ज्ञानेश्वर हा गव्हाला विहीरीचे पाणी देत असतांना काका सुभाष हा घटनास्थळी आला व आरोपी ज्ञानेश्वर शी वाद घातला.आज तू पाणी का देतोस आज तुझा दिवस नाही असे म्हणाले.रागाच्या भरात ज्ञानेश्वरने हातात असलेले फावडे सुभाष काळे यांच्या डोक्यात घालून त्यांना जागेवरच ठार केले. हा प्रकार सुभाष काळे यांची पत्नी व दोन मुले शेजारील शेतात भाजी खुडत असतांना पहात होते.ज्ञानेश्वरने सुभाष काळेंवर हल्ला करताच तिघे घटनास्थळी आले.तो पर्यंत सुभाष काळे गतप्राण झाले होते.व आरोपी ज्ञानेश्वर पळून गेला होता.काळे कुटुंबियांनी पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला.त्यांनी त्वरीत आरोपी ज्ञानेश्वर ला गावातूनच अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजश्री आडे करंत आहेत