AurangabadCrimeUpdate : मॉर्निंगवॉक दरम्यान युवतीसमोर नग्न होऊन अश्लील चाळे; मदतीसाठी धावलेल्या तरुणाच्या धुलाईनंतर माथेफिरु पसार…

औरंगाबादच्या समर्थनगर भागात आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास एक विचत्र आणि धक्कादायक घटना घडली. यामध्ये मॉर्निंगवॉक करणाऱ्या युवतीसमोर अचानकपणे दुचाकी थांबवत एका मनोविकृत माथेफिरू तरुणाने नग्न होऊन अश्लील चाळे करीत तिच्याकडे धाव घेतली दरम्यान त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाने हा प्रकार पाहिला आणि घटनास्थळी थांबून त्या माथेफिरुची यथेच्छ धुलाई केली परंतु त्याला पकडण्याच्या प्रयत्नांत असतानाच त्या माथेफिरू तरुणाने दुचाकीवरून पळ काढला. अभिजित उत्तमसिंग जिरे वय-35 (ढिम्बरगल्ली, बेगमपुरा )असे प्रत्यक्षदर्शी तरुणाचे नाव आहे. याबाबतची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे पोलिसउपनिरीक्षक योगेश धोंडेंनी घटनास्थळी भेट दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, अभिजित हा पहाटे कामा निमित्त समर्थ नगर भागात गेला होता दरम्यान रस्त्यावरून 17 ते 18 वर्षे वयोगट असलेली युवती हातात पाण्याची बाटली घेऊन मॉर्निंगवॉक करीत होती त्यावेळी दुचाकीवरून एक माथेफिरू तेथे आला व त्या युवतीच्या समोर काही अंतरावर दुचाकी थांबवत पॅन्ट काढून नग्न झाला. व युवती समोर अश्लीलचाळे करीत तिच्याकडे जात असताना युवती भेदरली व तिने आरडाओरड केली.आरडाओरड ऐकताच दुचाकीवरून जाणाऱ्या अभिजित या तरुणाने दुचाकी थांबवत त्या माथेफिरूला बदडले व त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो दुचाकीवरून पसार झाला.तरुणाने भेदरलेल्या युवतीला धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची विनंती केली मात्र बदनामीच्या भीती पोटी युवतीने तक्रार देण्यास नकार दिली.
तरुण स्वतः तक्रार देण्यासाठी गुन्हे शाखेत.
अनेक वेळा महिला तरुणीसोबत अशा प्रकारच्या घटना घडत असतात मात्र बदनामीच्या भीतीने किंवा पालक त्यांनाच जबाबदार धरतील या भीतीने तरुणी अशे प्रकार पालकांना सांगत नाहीत पोलिसात तक्रार करण्यास टाळाटाळ करतात परिणामी आशा माथेफिरूची हिम्मत अजून वाढते अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून तरुणाने पोलिस मुख्यालय गाठत गुन्हे शाखेशी संपर्क केला आहे. दुपारपर्यंत या प्रकरणी तरुणाने तक्रार दिली न्हवती.