MarathawadaNewsUpdate : गोदावरी नदीच्या काठी शेतात पीक घेतल्यामुळे नवबौद्ध ग्रामस्थांना अमानुष मारहाण

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातच दलित समाजातील कुटुंबावर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात पिक घेतल्याच्या कारणावरून गावातील लोकांनी कुटुंबाला लाठ्या-काठ्या आणि दगडाने मारहाण केली. माजलगाव तालुक्यातील हिवरागावात ही धक्कादायक घटना घडली आहे. हिवरागावात राहणाऱ्या एका नवबौद्ध समाजातील कुटुंबावर गावातील गावगुंडांनी भीषण हल्ला केल्याची संतापजनक घटना आज दुपारी घटली.
गोदावरी नदीच्या काठच्या शेतात पीक घेतल्यामुळे नवबौद्ध समाजाच्या नागरिकांना गावातील गावगुंडांनी अमानुष मारहाण केली. लाठ्या काठ्या आणि कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत ६ जण जखमी झाले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गावतील टोळक्याने पाठलाग करून नवबौद्ध समाजातील लहान मुलं आणि महिलांवर दगडफेक करून हाकलून लावले आहे. या व्हिडीओमध्ये महिलांचा रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येत आहे.
या मारहाणीत ६ जण जखमी झाले आहे. जखमींना माजलगाव इथं शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी दोन्ही गटातील जमावांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.