AurangabadNewsUpdate : पोलिस मुख्यालयातील उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, कर्मचा-याकडून ६ हजाराची लाच घेणे भोवले

औरंंंगाबाद : पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या तक्रारदार कर्मचा-याची व त्याच्या सहकार्याची रात्रपाळीची गार्ड ड्युटी न बदलण्यासाठी ६ हजाराची लाच घेणा-या उपनिरीक्षकास अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.११) दुपारी गजाआड केले. राजकुमार चांदणे (वय ५७) असे लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असल्याची माहिती अॅन्टी करप्शन विभागाच्या सुत्रांनी दिली. याप्रकरण्ीा बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस मुख्यालयातील ५३ वर्षीय तक्रारदार कर्मचारी व त्याच्या सहकार्याची गेल्या काही दिवसापासून रात्रपाळीत गार्ड ड्युटी सुरू आहे. रात्रपाळीतील गार्ड ड्युटी न बदलण्यासाठी तक्रारदार कर्मचारी व त्याच्या सहकार्याकडे उपनिरीक्षक चांदणे यांनी प्रत्येकी ३ हजार रूपये प्रमाणे ६ हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधिक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधिक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश पंडूरे, रविंद्र देशमुख, रविंद्र आंबेकर, गोपाल बरंडवाल, विलास चव्हाण आदींच्या पथकाने शुक्रवारी दुपारी पोलिस आयुक्तालय परिसरात सापळा रचून सहा हजाराची लाच घेणाNया उपनिरीक्षक राजकुमार चांदणे यांना रंगेहाथ पकडले.