MaharashtraCoronaUpdate : दिलासादायक : कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणारी संख्या अधिक

Today, newly 3075 patients have been tested as positive in the state. Also newly 7345 patients have been cured today. Totally 1730715 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 75767. The patient recovery rate in the state is 93.98%.
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 7, 2020
गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७ हजार ३४५ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण १७ लाख ३० हजार ७१५ करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.२८ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ७५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज ४० करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख १८ हजार ७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५५ हजार ३४१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५५ हजार १८० व्यक्ती होम क्वारंटाइन झाले आहेत. तर ५ हजार ५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७५ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३७०५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधितांची एकूण संख्या १८ लाख ५५ हजार ३४१ इतकी झाली आहे.