AurangabadNewsUpdate : भिक्खु करुणानंद थेरो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील “वर्ल्ड पीस ग्रँड पुरस्कार”

इंटरनॅशनल इंटरचेंज डेव्हलपमेंट असोसिएशन या संघटनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हा भिक्खूसंघाचे अध्यक्ष भिक्खु करुणानंद थेरो यांना “वर्ल्ड पीस ग्रँड पुरस्कार” देऊन सन्मानित केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी या जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या संघटनेकडून दरवर्षी मानव सेवेसाठी भरीव योगदान देणाऱ्या व कठीण परिस्थितीत सेवा व सहाय्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला “वर्ल्ड पीस ग्रँड पुरस्कार” देऊन सन्मानित केले जाते. दरम्यान भिक्खु करुणानंद थेरो यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाऊन विपश्यना एज्युकेशनल ॲण्ड सोशल ट्रस्टच्या माध्यमातून उल्लेखनीय धार्मिक तसेच सामाजिक कार्य करीत अआहेत . त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन या संस्थेने त्यांना “वर्ल्ड पीस ग्रँड पुरस्कार” देऊन सन्मानित केले आहे.