WorldNewsUpdate : भयंकरच !! कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांना दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश

संपूर्ण जगभरात ज्यांचे किस्से ऐकले जातात त्या उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांचा आणखी एक किस्सा जगासमोर आला आहे . आला आहे. या वृत्तानुसार कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या नियमांचं एका व्यक्तीने उल्लंघन केल्याचे निदर्शनास येताच , त्याला सर्वांसमोर उघडपणे गोळी घालण्यात आली आहे. एवढंच नाही, तर लोकांना घाबरवण्यासाठी उत्तर कोरियाने चीन सीमेवर एन्टी एयरक्राफ्ट बंदुकाही तयार ठेवल्या आहेत, आणि नियम तोडणाऱ्यांना दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हुकुमशाहच्या या कृत्यांमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
या बाबत रेडियो फ्री एशियाच्या हवाल्याने डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार दि . २८ नोव्हेंबर रोजी उत्तर कोरियाच्या सेनेने हुकुमशाह किम जोंग उन यांच्या आदेशानंतर एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडण्यात आलेला व्यक्ती, कोरोना काळातील नियम मोडून चीनमधून सामानाची तस्करी करताना आढळला होता. कोरोनाच्या भीतीने किमने आपल्या सर्व सीमा मार्च महिन्यापासून अधिकृतपणे बंद केल्या आहेत. अवैधपणे कुठेही जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्या व्यक्तीला थेट गोळ्या घालण्याचं पाऊल उचलण्यात आलं.
दरम्यान हुकुमशहा किम जोंग उन यांच्या मते त्यांच्या देशात कोरोनाचे आगमन कोणत्याही परिस्थितीत होता काम नये. त्यामुळे सीमावर्ती भागातील रहिवाशांना धमकावण्यासाठीच, नियम मोडणाऱ्याला या गोळ्या घालण्यात आल्या आहेत. किम जोंग उन यांना असा संशय आहे की, चीनच्या सीमेवरील लोक दुसऱ्या लोकांशी अधिक संपर्कात आहेत. काही लोक तस्करीतही सामील आहेत. त्यामुळे अशा लोकांमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नियम मोडणाऱ्या मृताचं वय ५० वर्ष आहे. तो व्यक्ती आपल्या चीनी साथीदारांसोबत गेल्या अनेक महिन्यांपासून सीमेपार तस्करी करत होता असे आरोप आहेत. त्यामुळे किम जोंग यांनी आपल्या सेनेतील विशेष तुकड्यांना बॉर्डर भागात तैनात केलं आहे, जेणेकरून बॉर्डर गार्ड्स तस्करीत सामिल आहेत की नाही, याचा तपास लावला जाऊ शकेल. उत्तर कोरियामध्ये कठोर सेन्सॉरशिरमुळे त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे.