MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ८ हजार ६६ रुग्ण करोनामुक्त तर ५ हजार १८२ नवे रुग्ण

Maharashtra reports 5182 new #COVID19 cases, 8066 discharges and 115 deaths today.
Total cases 18,37,358
Total recoveries 17,03,274
Death toll 47,472Active cases 85,535 pic.twitter.com/MnEtCzAv2j
— ANI (@ANI) December 3, 2020
गेल्या २४ तासात महाराष्ट्रात आज दिवसभरात ८ हजार ६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ३ हजार २७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.७० टक्के इतके झाले आहे. तर आज राज्यात ५ हजार १८२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज ११५ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा २.५८ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.