IndiaNewsUpdate : आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत झाली वाढ

आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीकरांना आता गॅस सिलेंडरसाठी ६४४ रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील वाढत्या महागाईमुळे सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. सीएनबीसी आवाजने हे वृत्त दिले आहे. घरगुती गॅस सिलेंडरची हि नवीन किंमती आजपासून लागू झाली आहे . या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅसच्या किंमती ६४४ रुपये झाली आहे. १ डिसेंबर रोजी तेल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शिअल गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. १९ किलोच्या या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत ५५ रुपयांनी वाढवण्यात आली होती.