IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : ‘कोव्हिशील्ड’ लस वादाच्या भोवऱ्यात , काय आहे नेमके प्रकरण ?

जगात सर्वत्र कोरोनाचा कहर चालू असताना कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी अनेक प्रगत देशात लसीवर संशोधन चालू आहे . भारतातील तीन लसीचे संशोधन प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या संशोधनाची माहिती घेण्यासाठी अहमदाबाद , हैद्राबाद आणि पुणे येथील औषध कंपन्यांच्या कार्यालयांना भेटी दिल्या . मात्र सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असलेल्या ‘कोव्हिशील्ड’ या प्रायोगिक लशीचा डोस घेतल्यानंतर मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा दावा चेन्नईतील एका स्वयंसेवकाने केल्यामुळे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे.
PM Modi to interact with three teams involved in developing COVID-19 vaccine today
Read @ANI Story | https://t.co/soA8SvfpPH pic.twitter.com/86F6ddELDW
— ANI Digital (@ani_digital) November 30, 2020
दरम्यान या लशीच्या चाचण्या तातडीने थांबवाव्यात; तसेच आपल्याला पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या व्यक्तीने केली आहे. तर कंपनीने सदर व्यक्तीवर १०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान करोना प्रतिबंधक लस निर्मितीमध्ये गुंतलेल्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चर्चा करणार आहेत. लस निर्मितीमध्ये गुंतलेल्या जीननोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील असे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. “करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात गुंतलेल्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी आज ३० नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करतील” असे पीएमओच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
नेमके प्रकरण असे आहे
चेन्नईत लस टोचण्यात आलेली व्यक्ती ४० वर्षांची आहे. सर रामचंद्र इन्स्टिट्यूटमध्ये त्याला लस देण्यात आली होती. ‘त्यानंतर काही दिवसांनी इन्सिफॅलोपथी (मेंदूचे कामकाज मंदावणे) झाला. चाचण्याअंती ही इजा प्रायोगिक लशीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. इलेक्ट्रोइन्सीफॅलोग्राम चाचणीत (ईईजी) मेंदूचे कामकाज अंशत: बिघडल्याचे (दोन्ही बाजूंचे काम बिघडल्याने मज्जासंस्थेचे कार्य विस्कळित होणे) निष्पन्न झाले. परिणामी, वाचासंस्थेत आणि दृष्टीमध्ये अंशत: बिघाड झाल्याचे मानसोपचार तपासणीत आढळले,’ असे या व्यक्तीने पाठविलेल्या कायदेशीर नोटिशीत म्हटले आहे.
या संदर्भात पुण्यातील सीरम इन्सिट्यूट, चेन्नईतील सर रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च यांच्यासह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेलाही (आयसीएमआर) यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. ‘कोव्हिशील्ड’ ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकी कंपनी ‘अॅस्ट्राझेनेका’ विकसित करीत आहेत. भारतातील त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीच सीरमला भेट देऊन लशीच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. दरम्यान ‘कोव्हिशील्ड प्रायोगिक लस सुरक्षित नसून, तिच्या चाचणीसाठी देण्यात आलेली परवानगी तातडीने रद्द करण्यात यावी,’ अशी मागणीही संबंधिताने केली आहे. या व्यक्तीची कायदेशीर नोटीस मिळाल्याचे सर रामचंद्र इन्स्टिट्यूटने मान्य केले आहे.
कंपनीचे म्हणणे असे आहे
या बाबत ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या वतीने करण्यात खुलाशात म्हटले आहे कि , तक्रारदाराने नोटिशीद्वारे केलेले आरोप बदहेतूने आणि दिशाभूल करणारे आहेत. स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याबद्दल आम्हाला सहानुभूती नक्कीच वाटते; परंतु त्यांनी त्याचे खापर लशीवर फोडणे खोटारडेपणाचे आहे. त्यांना जाणवणारा त्रास लशीमुळे होत नसल्याची पूर्ण कल्पना त्यांना वैद्यकीय पथकाने दिली होती, तरीही त्यांनी याबाबतीत जाहीर आरोप करण्याचा मार्ग अनुसरला. त्याबद्दल आम्हीच त्यांच्याकडे शंभर कोटी रुपयांची भरपाई मागणार आहोत.