CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले ६१८५ नवे रुग्ण तर ४०८९ डिस्चार्ज

राज्यात आज 6185 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4089 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1672627 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 87969 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.48% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 27, 2020
गेल्या २४ तासात ६ हजार १८५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर आज ८५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ०८ हजार ५५० इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची ही संख्या अधिक चिंता वाढवणारी आहे. दरम्यानच्या काळात रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र, दिवाळीनंतर या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
गेल्या २४ तासात ४ हजार ०८९ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ७२ हजार ६२७ इतकी झाली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ४८ टक्के इतके झाले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना करोनामृतांची संख्या मात्र अद्याप कमी आहे. राज्यात आज ८५ रुग्ण दगावले आहे सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५९ टक्के इतका आहे. तर, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८७ हजार ९६९ इतकी आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०६ लाख ३५ हजार ६०० चाचण्यांपैकी एकूण १८ लाख ०८ हजार ५५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख २८ हजार ३९५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ७ हजार २४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 6,185 new COVID-19 cases, 4,089 recoveries, and 85 deaths today, as per the State Health Department
Total cases: 18,08,550
Total recoveries: 16,72,627
Active cases: 87,969
Death toll: 46,898 pic.twitter.com/hCgwQ8RDZQ
— ANI (@ANI) November 27, 2020