AurangabadCrimeUpdate : वाहतूक पोलिसाला फरफटत नेणारा रिक्षाचालक नागरिकांच्या सतर्कतेमुळे अटक

औरंगाबाद – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या रिक्षा चालकाला जाब विचारणार्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेत गंभीर जखमी करणार्या रिक्षा चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. फारुक शहा निसार शहा रा. हिनानगर चिकलठाणा असे अटक आरोपीचे नाव आहे.
आज सकाळी ११ वा. वाहतूक पोलिस कर्मचारी मो.हसीबोद्दीन गयासोद्दीन शेख हायकोर्ट जवळील सिग्नलवर कर्तव्य बजावत होते.त्यावेळी चिकलठाण्याकडून आरोपी फारुकशहा हा रिक्षाचालकाच्या सिटवर दोन प्रवाशांना बसवून रिक्षाचालवत होता. असे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिस कर्मचारी हसीबोद्दीन यांनी आरोपी रिक्षा बाजूला घेण्यास सांगत रिक्षात बसत असतांना फारुकने रिक्षाचा वेग वाढवला त्यामुळे हसीबोद्दीन फरफटत गेले व त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. हा प्रकार घडंत असतांना नागरिकांनी बघ्याची भूमीका न घेता तत्परतेने रिक्षाचालकाला पकडून पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणी पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस करत आहेत.