AurangabadCrimeUpdate : चोलामंडलम फायनान्स कडून बुलेट विक्रेत्याची फसवणूक, एक अटक

औरंगाबाद – सिडकोतील बुलेट विक्रेता डिलर चेरी काॅर्पौरेशन यांची चोलामंडलम फायनान्सच्या अधिकार्यांनी बनावट ग्राहक उभे करुन ३लाख रु.ची फसवणूक केल्याचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
विजय वाघमारे असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या सोबंत चोलामंडलम चे वरिष्ठ अधिकारी सेल्समॅनेजर किशोर नायक, शाखा व्यवस्थापक शिवराज मोरे आणि क्लस्टर प्रणव नायक व अन्य दोन बोगस बुलेट खरेदीदार यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
गेल्या सहा नहिन्यांपासुन चोला मंडलम चे अधिकारी त्यांच्या ओळखीतील बोगस ग्राहक आणून चेरी काॅर्पोरेशन मधून बुलेट खरेदी करण्याचे नाटक करतात चोलामंडलम तर्फे बुलेट खरेदी करणार्याचे मोटरसायकल लोन मंजूर झाल्याचे पत्र बुलेट डिलर चेरी काॅर्पोरेशनला दिले जाते. अशा दोन प्रकरणात चेरी कार्पोरेशनने २लाख ९२हजारांच्या दोन बुलेट ५०हजार रु. बुलेट डिलर कडे भरंत विक्री करुन टाकल्या.या प्रकरणी चेरी काॅर्पोरेशन चे मालक मनीष दंडगव्हाळ यांनी फायनान्स कंपनीच्या अधिकार्यांची समजूत काढून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण वरील आरोपी दाद देत नसल्याचे दिसताच दंडगव्हाळ यांनी दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पाटील करंत आहेत