AurangabadCrimeUpdate : महिना भरातील दोन चोर्या उघडकीस, दोन अटकेत, ४ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद- १४ आॅक्टोबर ते १७नोव्हेंबर या काळात खिडक्यांचे गज कापून २२काॅपर वायर ची बंडले चोरणार्या दोघांना मुद्देमालासहित वाळूज औद्योगिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अस्लम बाबू पठाण(३०) रा.भारतनगर वाळूज, शेख दाऊद शेख हनीफ (२३) रा.अजवाननगर वाळूज अशी अटक आरोपींची नावे आहेत.सी.सी.टि.व्ही.फुटेज वरुन निष्पन्न झालेल्या आरोपींनी गेल्या महिनाभसात दोन कंपन्यांमधे चोरी केल्याची कबुली देत चोरलेला मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला.
१४आॅक्टोबर रोजी दिग्वीजय इंडस्र्टीज व १७नोव्हेंबर रोजी सेटआॅन साईट या वाळूज औद्योगिक परिसरातील कंपनीमधून काॅपर वायर चोरीला गेल्याचे दोन गुन्हे दाखल झाले होते.
वरील कारवाई पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे, एसीपी श्रीकांत सराफ यांच्या मार्ग द
र्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय वावळे, पोलिस कर्मचारी प्रकाश गायकवाड, खय्यूम पठाण, रेवणनाथ गवळे, नवाब शेख,विनोद परदेशी, बंडू गोरे यांनी पार पाडली