AurangabadCrimeUpdate : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी त्याने चोरून दाखवली सोन्याची बिस्किटे

औरंगाबाद – प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी तिने दिलेल्या टिपवरुन गजानन नगरातील शिंदे यांच्या घरातून २८ ग्रॅमचे दोन सोन्याचे बिस्कीट चोरणारा चोरटा सिडको पोलिसांनी एन – १ परिसरातून मुद्देमालासहित अटक केला. प्रथमेश दत्तप्रसाद व्यास (२१) रा.एन १ असे चोरट्याचे नाव आहे.
या विषयी पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , फिर्यादी राणी शिंदे यांच्या नात्यातील एक मुलगी आणि प्रथमेश चे एकमेकांवर प्रेम होते. तिच्या सांगण्यावरुन प्रथमेशने सोन्याचे बिस्कीट शिंदे यांच्या घरातून चोरल्याची कबुली सिडको पोलिसांना दिली. पण त्यानंतर प्रथमेश आणि त्याच्या प्रेयसीचं ब्रेकअप झालं . दरम्यान प्रथमेशने ते दोन बिस्कीट मुकुंदवाडीतील समर्थ ज्वेलर्स या सोनाराला विकले. प्रथमेशचे वडिल चांगले व्यावसायिक असून प्रथमेश छंद म्हणून घरफोड्या व चोर्या करंत असल्याचे सिडको पोालिसांच्या तपासात उघंड झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके करंत आहेत.