WorldNewsUpdate : तुम्हाला हे माहित आहे का ? सत्तेच्या काळात “या” फेकूने फेकल्या २० हजार खोट्या बाता … !!

तसेही राजकारणी आणि सत्ताधारी म्हटले कि , फेकाफेकी आलीच !! मग ती प्रचार सभांमधली भाषणं असोत कि , संसदेतली . आपण कुठे कुणाला काय बोलत आहोत याचे कुठलेही भान अशा लोकांना नसते हेच यातून स्पष्ट होत आहे . हे नेते आहेत दि ग्रेट डोनाल्ड ट्रम्प !! यांच्यावर सातत्याने अनेकदा खोटी माहिती देण्याचा आरोप करण्यात आला होता. इतकंच नव्हे तर मतमोजणीपासून ते अगदी निकाल लागेपर्यंत आणि निकाल लागल्यानंतरही ट्रम्प यांनी आपली खोटं बोलण्याची सवय सुटू दिली नाही. विशेष म्हणजे याच कारणावरून अमेरिकेतील वृत्तवाहिन्यांनी त्यांचे लाइव्ह भाषणही थांबवले. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डोनाल्ड ट्रम्प यांनी २० हजारांहून अधिक खोटी वक्तव्ये केली आहेत. फॅक्ट चेक वेबसाइट पॉलिटीफॅक्टने हा दावा केला आहे. आपल्याकडे भारतात मात्र असे क्वचितच घडेल.
या वेबसाईटच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांची वक्तव्ये कायम चर्चेत राहिली. दरम्यानच्या काळात ट्रम्प यांनी माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न केला. तरी , माध्यमांनी ट्रम्प सरकारच्या कारभाराचे खरे रूप जनतेला दाखवलेच. वॉशिंग्टन पोस्टच्या डेटाबेसनुसार, ट्रम्प यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांच्या खोट्या वक्तव्यांची दिवसेंदिवस वाढत गेली असल्याचा दावा करण्यात आला. ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास ४०७ वेळेस आपण अर्थव्यवस्था आणखी मजबूत केली असल्याचा दावा केला. वास्तविक पाहता ट्रम्प यांच्यापेक्षा आयझनहावर, लिंडन बी जॉन्सन आणि बिल क्लिंटन यांच्या कारकिर्दीत अमेरिकेची आर्थिक व्यवस्था अधिक चांगली होती.
दरम्यान ट्रम्प यांनी राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करण्यासाठी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच मेक्सिको सीमेवर होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवर मोठी भिंत बांधण्याची घोषणा केली होती. लवकरच भिंत बांधण्याचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी सातत्याने केला. वास्तविक पाहता काँक्रीटची एक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, आधीपासून असलेल्या कुंपणाच्या भागाला वाढवण्यासाठी हे काम करण्यात आले आहे. २०१६ मधील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने रशियन हस्तक्षेप नसल्याचे सांगत आले आहेत. तर, मूलर रिपोर्टमध्ये ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यासाठी त्यांच्या रशियन सहकाऱ्यांनी हिलरी क्लिंटन यांना बदनाम करण्याचा कट आखला असल्याचे म्हटले होते. रशियन हस्तक्षेपाबाबत या निवडणुकतही चर्चा होती.
अमेरिकेतील राजकीय अभ्यासकांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या या दुर्गुणांमुळेच पराभव झाला आहे. त्याच वेळेस ट्रम्प यांनी या पराभवासोबत नकोसा वाटणारा १२८ वर्ष जुना विक्रमही मोडला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सलग दुसऱ्यांदा लोकांनी पॉप्युलर वोटमध्ये पराभूत केले आहे. याआधी बेंजामिन हॅरिसन यांनाही लोकांनी पॉप्युलर वोट्समध्येही पराभव केला होता. बेंजामिन हे १८८८ मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान त्यांना कमी मते असूनही ते राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यांनी पुढील वर्षाही निवडणूक लढवली. मात्र, ग्रोव्हर क्लेवलँड यांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळीही बेंजामिन यांना पॉप्युलर वोट्समध्येही पराभव स्विकारावा लागला.