Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadLatestNewsUpdate : ताजी बातमी : पदवीधर मतदार संघाची भाजपची नावे जाहीर , औरंगाबादधून शिरीष बोराळकर

Spread the love

भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी पदवीधर  विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2020 करीता उमेदवारी जाहीर केली आहे. सोशल इंजिनिअरिंगचे पालन करताना भाजपाची हि नावे निवडताना बरीच कसरत झाली. यासाठी भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी मोठी फिल्डिंग लावली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. नागपूरमध्ये गडकरी खोले यांच्या नावासाठी आग्रही होते मात्र तेथे माजी महापौर संदीप जोशी यांचे नाव घोषित झाले आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे.


औरंगाबाद विभागातून देवेंद्र फडणवीस यांचा शिरीष बोराळकर यांच्यासाठी , चंद्रकांत पाटील यांचा उद्योजक किशोर शितोळे यांच्यासाठी तर पंकजा मुंडे यांचा प्रवीण घुगे यांच्यासाठी प्रयत्न होता त्यात देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असलेल्या शिरीष बोराळकरांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सामाजिक आणि जातीय समीकरणात किशोर शितोळे यांना औरंगाबाद विभागातून उमेदवारी मिळावी म्हणून पाटील आग्रही होते परंतु प्रदेशाध्यक्ष असूनही फडणवीस यांनी नागपूर बरोबर औरंगाबादचीही जागा मिळवली.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ शिरीष बोराळकर

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ संग्राम देशमुख

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ संदीप जोशी

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ नितीन धांडे.

आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा बँकेचे नितीन पाटील, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, जिल्हाध्यक्ष संजय केणेकर व जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!