MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ऑनलाईन , दुपारी साधणार जनतेशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १. ३० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना , घडामोडी , मुंबईच्या लोकलचा प्रश्न , राज्यात बंद असलेली मंदीर , कोरोना विषयक सूचना , शेतकऱ्यांचे प्रश्न , मराठा आरक्षण , अर्णब गोस्वामींच्या अटेकवरून विरोधकांनी केलेली राज्य सरकारवर टीका. या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग हळू हळू कमी होत असला तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी कोणती खबरदारी घ्यायची आणि राज्याची सध्याची स्थिती काय आहे ? मेट्रो शेडवरून होत असलेले राजकारण यावर मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे .